scorecardresearch

भर कार्यक्रमात पत्रकाराने वरुण धवनला विचारला ‘तो’ खाजगी प्रश्न; अभिनेता म्हणाला, “आजच बायकोबरोबर…”

बिग बॉस’च्या मंचावर सलमानने वरुणकडे इशारा करत तो लवकरच बाबा होणार असल्याचे संकेत प्रेक्षकांना दिले होते

varun dhwan final
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा भेडिया चित्रपट प्रदर्शित झाला होता. मागच्या काही दिवसांपासून तो वेबसीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे. ज्यात तो अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता तेव्हा त्याने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी झी सिने अवॉर्ड्स २०२३ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये वरुण धवनला कुटुंब नियोजनाबद्दलबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी कुटुंब नियोजन कधी करेन हे मी माझ्या बायकोला विचारेन आणि आजपासून सुरवात करेन.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

‘तारक मेहता…’ मालिका सोडून ६ महिने झाले तरी शैलेश लोढांना मिळालं नाही मानधन; निर्मात्यांनी केलं दुर्लक्ष

२०२२ हे वर्ष अनेक सेलिब्रेटी कपल्ससाठी खूप खास ठरलं. यावर्षी अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकले तर अनेकांच्या घरी पाळणा हलला. प्रियांका चोप्रा-निक जोनस, सोनम कपूर-आनंद अहुजा भारती सिंग-हर्ष लिंबाचिया, बिपाशा बासू-करण सिंह ग्रोवर, आलिया भट्ट-रणबीर कपूर ही जोडपी आई-बाबा झाली.

Video : “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे…” रुचिरा जाधवचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

वरूण आणि नताशाने २४ जानेवारी २०२२ रोजी अलिबागमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. यापूर्वी २ वेळा नताशा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नताशाने त्या सर्व अफवा असल्याचे सांगत त्या चर्चांना पूर्णवीराम दिला होता. त्यामुळे आता सलमान जे म्हणाला ते खरं आहे का, हे जाणून घेण्यासाठी वरुणचे चाहते आतुर झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 12:04 IST
ताज्या बातम्या