बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन, प्रोड्यूसर एकता कपूर आणि शोभा कपूरला ऑस्कतर्फे आमंत्रण मिळालंय. हे तीन भारतीय कलाकार आता अकादमी अवॉर्ड क्लास २०२१ मध्ये सहभाग घेऊन मतदान करणार आहेत. यासाठी जगभरातून निवडलेल्या एकूण ३९५ मध्ये या तीन सेलिब्रिटींची निवड करण्यात आलीय.
‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. ‘अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड आर्ट सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील शेकडो चित्रपट भाग घेतात. परंतु त्यांपैकी मोजक्याच चित्रपटांना स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा सन्मान मिळतो. या चित्रपटांची किंवा कलाकारांची निवड जगभरातील तज्ज्ञ मंडळी करतात. या तज्ज्ञांच्या समितीत आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन, प्रोड्यूसर एकता कपूर आणि शोभा कपूर यांना देखील स्थान मिळालंय. या तीन सेलिब्रिटी आता हॉलिवूडच्या आंद्रा डे, मारिया बाकलोवा, ईजा गोंजालेज, हेनरी गोल्डिंग, वॅनेसा किर्बी, रॉबर्ट पॅटिनसन यासांरख्या सुप्रसिद्ध सेलिब्रिटीजच्या नावाबरोबर जोडले जाणार आहेत.
अभिनेत्री विद्या बालनला ‘तुम्हारी सुलु’ आणि ‘कहानी’ चित्रपटातून नवी ओळख मिळाली. ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटासाठी एकता कपूरची तर तिची आई शोभा कपूरची ‘उडता पंजाब’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी निवड करण्यात आलीय.
It’s time to announce our new members! Meet the Class of 2021. https://t.co/17gbIEXOzJ #WeAreTheAcademy
— The Academy (@TheAcademy) July 1, 2021
ऑक्सरचा यंदाचा २०२१ स्पेशल ग्रूप हा ४६% महिला, ३९% कमी प्रतिनिधित्व असलेले जातीय समुदाय आणि ५३% आंतरराष्ट्रीय लोकांनी मिळून बनवलेला आहे. जवळपास ५० देशांमधून या सर्वांची निवड करण्यात आलीय. अकादमीच्या अनेक शाखांमध्ये सामिल होण्यासाठी आठ जणांना आमंत्रित करण्यात आलंय. यात लेस्ली ओडोम ज्यूनिअर, फ्लोरिअन जेलर, शाका किंग, अलेक्जेंडर नानाउ, एमराल्ड फेनेल, ली इसाक चुंग, क्रेग ब्रेवर आणि कौथर बेन हानिया यांच्या नावांचा समावेश आहे.
ऑस्कर अकॅडमीमध्ये यंदा व्यापक बदल दिसून येत आहेत. ऑक्सर अकॅडमीची सर्व समावेशकता आणि विविधता यंदाच्या मतदान समितीत सुद्धा दिसून आली. यापूर्वी अकॅडमीवर केलेल्या अनेक आरोपानंतर हे बदल दिसून येत आहेत. अकॅडमीची बहूतांश मदतान समितीतील सदस्य हे कोकेशियन आहे. त्यामूळे ऑस्करच्या मतदान समितीत आंतरिक वाद निर्माण झाले होते.
ऑस्करकडून भारतीय कलाकारांना आमंत्रण मिळाल्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा अनेक भारतीय कलाकारांना ऑस्कर अकॅडमीमध्ये सामील होण्यासाठी आणि ऑस्करमध्ये मतदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यात अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान तसंच फिल्म निर्माते गौतम घोष आणि बुद्धदेव दासगुप्ता यांचा समावेश आहे.