‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्ये दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने होस्टची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु आता काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस ओटीटी’चा पुढील सीझन करण जोहर होस्ट करणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर अदा शर्मा दिसणार नव्या भूमिकेत! ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

‘बिग बॉस ओटीटी’ पुढील पर्वाचे करण जोहर सूत्रसंचालन करणार नसल्याने पुन्हा एकदा ही जबाबदारी बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानकडे आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला शोचा प्रीमियर होण्याची शक्यता आहे. हा शो प्रेक्षकांना तीन महिने ‘वूट’वर (VOOT) पाहता येणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये स्टॅण्डअप कॉमेडियन आणि लॉकअप सीझन-१ चा विजेता मुनव्वर फारुकी सहभाग घेण्याची शक्यता आहे. मुनव्वर गेल्या वर्षी पासपोर्टमधील काही अडचणींमुळे ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही.

हेही वाचा : माझे नाव ‘आयुष्मान’ नव्हते; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला “शाळेत जाण्यापूर्वी…”

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-१ मध्ये ‘दिव्या अग्रवाल’ विजयी झाली होती. पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, जीशान खान, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन यांसह एकूण १५ तगडे खेळाडू सहभागी झाले होते. तसेच अभिनेता सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है-३’ चित्रपटासाठी काम करीत असून यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss ott season 2 reports claims salman khan to replace karan johar show sva 00