Saif Ali Khan Nikita Dutta Romance in Jewel Thief : अभिनेता सैफ अली खान त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सैफचा ‘ज्वेल थीफ’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट येतोय. यात त्याच्याबरोबर जयदीप अहलावत व अभिनेत्री निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘ज्वेल थीफ’मधील दुसरं गाणं ‘इल्जाम’ रिलीज झालं आहे. या चित्रपटात सैफने त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर किसिंग सीन केला आहे. ही अभिनेत्री सैफची मुलगी सारापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी आहे.

‘कबीर सिंह’ व ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ मध्ये झळकलेली निकिता दत्ता हिच्याबरोबर सैफ ‘इल्जाम’मध्ये रोमान्स करताना दिसतोय. हे गाणं १७ एप्रिलला रिलीज करण्यात आलं. या गाण्यात सैफ व निकिताची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. दोघांचे किसिंग व रोमँटिक सीन्सही आहेत. ५४ वर्षीय सैफचे २० वर्षांनी लहान निकिताबरोबरचे किसिंग सीन सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

निकिता ३४ वर्षांची आहे, तर सैफची मुलगी सारा अली खान २९ वर्षांची आहे. या गाण्यात जयदीप अहलावतची झलकही पाहायला मिळत आहे. गाणं कुमार यांनी लिहिलं आहे. शिल्पा राव आणि विशाल मिश्रा यांनी हे गाणं गायलं आहे. ‘इल्जाम’ हे ‘ज्वेल थीफ’चं दुसरं गाणं आहे. याआधी निर्मात्यांनी ‘जादू’ नावाचे एक गाणं रिलीज केलंय, ज्याला लोकांची चांगली पसंती मिळाली.

पाहा गाणं

चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी १४ एप्रिल रोजी ‘ज्वेल थीफ’चा ट्रेलर रिलीज केला, ज्यामध्ये सैफ आणि जयदीप दोघेही उत्तम अभिनय करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना खिळवून ठेवतील. जयदीप व सैफला या क्राइम थ्रिलर चित्रपटात एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

‘ज्वेल थीफ’चे दिग्दर्शन कुकी गुलाटी आणि रुबी ग्रेवाल यांनी मिळून केले आहे. तसेच ‘पठाण’, ‘फायटर’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ आनंदही या चित्रपटाशी जोडला गेला आहे. त्याने पत्नी ममता आनंदबरोबर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ज्वेल थीफ’ २५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.