सुपरस्टार रजनीकांत(Rajnikant) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वैट्टेयन'(Vettaiyan) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दिवाळीनंतर ७ नोव्हेंबरला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा ‘वैट्टेयन’ चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आणि कुठे?

व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “१० ऑक्टोबरला ‘वैट्टेयन’ थिएटरमध्ये रिलीज झाला. साधारणत: ९९ टक्के तमिळ चित्रपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी ओटीटीवर रिलीज होतात. ‘वैट्टेयन’ हा अद्याप हिंदीमध्ये प्रदर्शित झाला नाही, याचा अर्थ असा की कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज केला जातो. जर ‘वैट्टेयन’ खरंच ओटीटीवर येणार असेल तर तो दोन महिने होण्याआधीच ओटीटीवर रिलीज केला जातोय. या सगळ्यात ‘वैट्टेयन’चे ओटीटी प्लॅटफॉर्मने हक्क खरेदी केल्याने तो ॲमेझॉन प्राइमवर ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, चित्रपट अद्याप थिएटरमध्ये असल्यामुळे ओटीटीवर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत घोषणा एक किंवा दोन दिवस आधी होईल.”

‘वैट्टेयन’चे सर्व भाषेतील हक्क ॲमेझॉन प्राइमला ९० कोटींना विकले गेले आहेत, असे म्हटले जात आहे. हा चित्रपट ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे.

हेही वाचा: Video: “अशा काहीही अफवा पसरवू नका”, ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने केली विनंती, नेमकं काय घडलं? वाचा…

दरम्यान, या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दोन दिग्गज कलाकारांना अनेक वर्षांनंतर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. अमिताभ बच्चन यांनी ‘वैट्टेयन’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमात रजनीकांत यांच्या साधेपणाची आठवण सांगितली होती. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्याबरोबरच या चित्रपटात फहाद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वॉरियर, रितिका सिंग, दुशरा विजयन व व्ही. जे. रक्षा हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When rajinikanth starrer vettaiyan movie release on ott and which platform nsp