Raghav Chadha wishes Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा आई झाली आहे. तिने १९ ऑक्टोबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिचे पती, आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.

राघव आणि परिणीतीने पोस्टमध्ये लिहिले होते, “आमच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे. खरंच यापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे आठवत नाहीये… त्याच्या येण्याने आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालंय. आधी आम्ही दोघं एकमेकांसाठी होतो आणि आता आमच्याकडे सर्वकाही आहे.”

या सर्वांमध्ये राघव चड्ढा यांनी त्यांची पत्नी परिणीतीला इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी तिच्या मॅटरनिटी फोटोशूटमधील न पाहिलेले फोटोदेखील शेअर केले. राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर परिणीती चोप्राच्या मॅटरनिटी फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये राघव परिणीतीच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ते दोघे एकत्र खूप गोंडस दिसत आहेत.

राघव चड्ढा यांची पोस्ट

राघव यांनीही परिणीतीचे कौतुक केले आणि तिला ‘सर्वात चांगली आई’ म्हटले. राघव यांनी फोटोला कॅप्शन दिले की, “सर्वात चांगल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. गर्लफ्रेंड ते बायको ते आमच्या लहान मुलाची आई असा किती अविश्वसनीय प्रवास होता.”

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत. परिणीतीने २०१२ साली अभिनेता अर्जुन कपूरच्या ‘इश्कजादे’ चित्रपटातून बॉलीवूड करिअरची सुरुवात केलेली. हा दोघांचा डेब्यू चित्रपट होता.

त्यानंतर परिणीती ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा होती. दोन्ही चित्रपटांत तिचा लीड रोल होता. परिणीतीने बॉलीवुडमध्ये ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘अमर सिंह चमकीला’, ‘हंसी तो फंसी’ सारख्या चित्रपटांत काम केलंय.

परिणीती एक हुशार विद्यार्थिनी होती. तिने ब्रिटनच्या मॅन्चेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्स विषयात ट्रिपल ऑनर्सची डिग्री घेतली आहे. तिला बँकर बनायचं होतं. तिला लंडनमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती, पण मंदीमुळे तिला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये पीआर म्हणून काम केलं.