बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लवकरच ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये ती १६ सेलिब्रिटींना ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद करणार आहे. आता कंगनाच्या लॉकअपमध्ये अभिनेत्री पूनम पांडे देखील असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘लॉक अप’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती कंगनाच्या लॉकअपमध्ये असल्याचे दिसत आहे. पूनमसोबतच निशा रावल आणि मुनव्वर फारुकी हे दोन स्पर्धक या शोमध्ये दिसणार आहेत.
Video: एकता कपूरला गुंडांनी बंदूकीचा धाक दाखवला अन्…

पूनम पांडे ही कायमच चर्चेत असते. तिने २०१३मध्ये ‘नशा’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. पूनम ही बोल्ड व्हिडीओ आणि फोटोंमुळे कायमच चर्चेत असते.

कंगनाच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा शो एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey will be the third contestant in kangana ranaut reality show lock upp avb