चित्रपटकर्ता आणि टॉक शोचा सुत्रसंचालक करण जोहर चटपटीत संवादांनी भरलेला ‘कॉफी विथ करण’ हा आपला प्रसिध्द टॉक शो पुन्हा घेऊन येत आहे. या शोचे हे चौथे पर्व असून, काही प्रसिध्द कलाकारांच्या वैविध्यपूर्ण अशा मनोरंजक जोड्या या पर्वात पाहायला मिळणार असल्याचे समजते. सध्या चर्चेत असलेल्या दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या पर्वाच्या पाचव्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, दीपिका पदुकोण आणि करणबरोबरचे आपले छायाचित्र प्रियांकाने इन्स्टाग्रामवर प्रसिध्द केले आहे.
या शोच्या मागील पर्वात दीपिका पदुकोण सोनम कपूरसोबत आली होती. या देघींच्या रणबीर कपूरवरील मतप्रदर्शनाने आणि संवादाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या शोच्या पहिल्या पर्वात प्रियांका चोप्रा अर्जुन रामपालबरोबर आली होती, तर तिसऱ्या पर्वात शाहीद कपूरबरोबर आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra deepika padukone to have koffee with karan