Pushpa 2 Kissik Song Out Now : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता प्रदर्शित होणार्‍या दुसऱ्या भागाकडून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अल्लू अर्जुनच्या जबरदस्त अंदाजाने व डायलॉग्जनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या ‘पुष्पा’मधली सगळी गाणी विशेषत: ‘ऊ अंटावा’वरील समांथाचा डान्स सर्वत्र चर्चेत आला होता. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यानंतर आता दुसऱ्या भागात कोणतं आयटम साँग ऐकायला मिळणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर या गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. समांथाने आयटम साँगसाठी तगडं मानधन घेत डान्स केला होता. मात्र, आता दुसऱ्या भागात तिच्याऐवजी एका नव्या दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

हेही वाचा : ५ वर्षांनी मालिका संपली, सेट तुटला…; ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची भावुक पोस्ट; सेटवरची ‘ही’ गोष्ट आणली स्वत:च्या घरी

‘पुष्पा २’चं ‘किसिक’ गाणं चेन्नईत एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आलं. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आणि अल्लू अर्जुन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. श्रीलीलाने तिच्या हटके स्टाइलने आणि दमदार डान्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे. या गाण्याला अवघ्या काही तासातच लाखोंच्या घरात व्ह्यूज आले आहेत.

‘किसिक’ गाण्याच्या प्रदर्शनासाठी चेन्नईत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानासह श्रीलीला सुद्धा उपस्थित होती. गाण्याच्या रिलीज इव्हेंटला प्रमुख कलाकारांसह चित्रपटाच्या निर्मात्यांनीही आपली उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हाती सोपवली नव्या गाडीची किल्ली; किंमत ऐकून थक्क व्हाल…

दरम्यान मिडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा २’च्या एका डान्ससाठी श्रीलीलाने तब्बल २ कोटींचं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. तिच्या यापूर्वीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर श्रीलीला ही टॉलीवूडची नवोदित डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने ‘गुंटूर करम’ चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाण्यात महेश बाबूबरोबर धमाकेदार नृत्य सादर केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 kissik song out now allu arjun and sreeleela sizzling chemistry in dance number sva 00