बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश हादरला. येत्या १४ जून रोजी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची पहिली पुण्यतिथी आहे. सुशांतला जाऊन एक वर्ष पूर्ण होत असलं तरी अजुनही सुशांतचे कुटूंब, मित्र-मैत्रिणी आणि फॅन्स त्याला विसरू शकले नाहीत. सुशांतच्या कुटूंबियां व्यतिरिक्त इतर सेलिब्रिटी सुद्धा सुशांतची आठवण काढत वेगवेगळी पोस्ट शेअर करत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस १४’ फेम गायक राहूल वैद्यने सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत एक ट्वीट केलंय. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.

गायक राहूल वैद्य याने त्याच्या ट्वीटर अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट लिहून सुशांत सिंह राजपूतची आठवण काढली आहे. यात त्याने लिहिलं, “खूप दिवसांपासून काही बोलायची इच्छा होती…सुशांत भाई अमर रहा…प्रत्येक दिवशीच तुझी आठवण येते.” राहूलने ही पोस्ट शेअर करताना रेड हार्ट इमोजी वापरून #SushantSinghRajput हा हॅशटॅग देखील दिलाय.

राहूल वैद्य याच्यासह आणखी इतर सेलिब्रिटींनी सुद्धा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. टीव्ही अभिनेता आणि मॉडेल अली गोनीने सुद्धा सुशांतच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने लिहिलं, “सुशांतच्या मृत्यूला आता जवळजवळ एक वर्ष होईल…पण एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी सुशांतच्या फॅन्सनी त्याला ट्वीटरवर ट्रेंड केलं नाही…हेच तर कमवलंय सुशांतने!”

(Photo: Instagram@alygoni)

१४ जून रोजी बॉलिवूड स्टार सुशांत सिहं राजपूतचा मृत्यू झाला होता. तो त्याच्या प्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या मृत्यूबाबत तपास करण्यासाठी जगातल्या मोठ मोठ्या एजन्सीज कामाला लागल्या आहेत. सोबतच सुशांतचे फॅन्स देखील सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्तानं सध्या त्याचं नाव ट्वीटरवर ट्रेंड होताना दिसून येतंय.