Salman Khan opens up on struggle with brain aneurysm : इंडस्ट्रीचा भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान नेहमीच त्याच्या ताकद आणि स्वॅगसाठी ओळखला जातो. त्याचे नाव ऐकताच सर्वांत आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे ताकद आणि त्याची शरीरयष्टी.
अनेकांना माहीत नाही की, या सुपर-बीस्ट व्यक्तिमत्त्वामागे, अभिनेता अनेक वेदनादायक आरोग्य समस्यांशी झुंजत आहे. तरीही तो कधीही त्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसू देत नाही आणि सतत स्वतःवर काम करत राहतो.सलमान खानने यापूर्वी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम व आर्टेरिओव्हेनस मॅलफॉर्मेशनसह अनेक गंभीर आजारांबद्दल उघडपणे सांगितले आहे. अलीकडेच, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये त्याने त्याच्या आरोग्याच्या संघर्षांबद्दल उघडपणे सांगितले.
सलमान खानचा त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

सलमान खानच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का प्रश्नापासून हे सर्व सुरू झाले. सलमानने हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर दिले, “माझ्या आयुष्यात कोणीही नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर, इतके त्याग करण्याची आणि पती-पत्नीमधील भांडणे सहन करण्याची माझ्यात क्षमता नाही. मी अशा टप्प्यावर आहे, जिथे मला माझी स्वतःची जागा आवडते आणि ती कोणाबरोबरही शेअर करायची नाही.”

सलमान खान पुढे म्हणाला, “तर आपण मोडत असलेली ही सर्व हाडे, शरीराच्या बरगड्या तुटल्या, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आहे त्यावर उपचार सुरू आहेत, मेंदूत एन्युरिझम आहे, त्यावर उपचार सुरू आहेत, एव्ही मालफॉर्मेशन आहे, त्यावर उपचार सुरू आहेत.. अ‍ॅक्शन, येथून उडी मारणे, तिथून पडणे, चालता येत नाही, नाचणे… हे सर्व माझ्या आयुष्यात चालू आहे.”

२००७ च्या सुमारास सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूराल्जियाची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी तो ‘पार्टनर’ चित्रपटाचे चित्रीकरण करीत होता. त्याला अनेक वर्षे तीव्र वेदना होत होत्या आणि त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्याला या वेदनांशी झुंजावे लागले. २०११ मध्ये तो शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेला होता.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. ‘सिकंदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. आता सलमान खान लवकरच गलवान घाटीमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित चित्रपटावर काम सुरू करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan has diseases actor revealed the great indian kapil show aam