अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहे. साराचे लाखो चाहते आहेत. मालदीववरून मुंबईत परतल्यानंतर साराचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी सारा एका चाहत्यावर संतापली होती.
साराचा हा व्हिडीओ ‘जासूस हीयर’ या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंग दिसतं आहेत. व्हिडीओत साराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओत एक मुलगा साराला पाहताच तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. तेव्हाच तो मास्क खाली घेतो आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सारा त्याला थांबवते आणि बोलते की “तू काय करतोयस? तुम्ही असं करु शकतं नाही’. त्यानंतर सारा फोटोग्राफर्सला करोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी सांगते.
दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सारासोबत मुख्य भूमिकेत वरुण धवन होता. तर, सारा लवकरच ‘अतरंगी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि धनुष सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.