Upcoming Theatrical Movie Releases in September 2025 : बॉलीवूडसाठी सप्टेंबर २०२५ हा एक खास महिना असणार आहे. कारण- या महिन्यात अनेक रोमांचक आणि मनोरंजनाने भरलेले चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होणार आहेत.
रोमान्स, ॲक्शन, हॉरर, ड्रामा व कॉमेडी यांसारख्या शैलींचा उत्तम मिलाफ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या आठवड्यापर्यंत अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत.
कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल आणि कोणता चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकेल याची प्रेक्षकही उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्या आठ मोठ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
बागी ४
‘बागी’ फ्रँचायजी नेहमीच जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. टायगर श्रॉफचा हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसेल. ‘बागी ४’ बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई करेल, अशी अपेक्षा आहे. ‘बागी ४’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये टायगर आणि संजय दत्त यांच्यातील जबरदस्त भांडण पाहायला मिळते. हा हिंदी चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
द बंगाल फाइल्स
‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर दिग्दर्शक आता असाच आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘द बंगाल फाइल्स’. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दिल मद्रासी
‘दिल मद्रासी’ या तमीळ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह खूपच वाढला आहे. हा चित्रपट श्री लक्ष्मी मूव्हीजच्या बॅनरखाली बनविण्यात आला आहे. अभिनेता शिवकार्तिकेयव्यतिरिक्त यात रुक्मिणी वसंत आणि विद्युत जामवाल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
केडी द डेव्हिल
‘केडी द डेव्हिल’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचीही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता ध्रुव सरजा यांच्या या चित्रपटात संजय दत्त, शिल्पा शेट्टी व नोरा फतेही यांसारख्या कलाकारांचा दमदार अभिनयही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
द कॉन्ज्युरिंग लास्ट रीट्स
जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमची प्रतीक्षा सप्टेंबरमध्ये संपणार आहे. हॉलीवूडच्या लोकप्रिय हॉरर सीरिजचा शेवटचा भाग ‘द कॉन्ज्युरिंग लास्ट रीट्स’ ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
एक चतुर नार
नील नितीन मुकेशदेखील मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. त्याचा ‘एक चतुर नार’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दिव्या खोसला दिसणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.
जॉली एलएलबी ३
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ त्याच्या मजेदार कोर्टरूम ड्रामासाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
निशांची
‘जॉली एलएलबी ३’बरोबरच आणखी एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे नाव ‘निशांची’ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.