बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. सुहाना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. शाहरुखच्या गाडीभोवती चाहते गोळा झाले की सुहाना रडू लागायची असा खुलासा शाहरुखने एका मुलाखतीत केला आहे.

२०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला आहे. अबरामच्या तुलनेत सुहाना आणि आर्यन लहान असताना लाजाळू होते. आर्यनला गाडीचा त्रास व्हायचा म्हणून तो कधीतरी चित्रपटाच्या सेटवर यायचा. दुसरीकडे, जेव्हा त्याच्या गाडीभोवती लोक गोळा व्हायचे तेव्हा सुहानाला भीती वाटायची आणि ती रडायची. तर अबराम हा अनेक वेळा शाहरुखसोबत चित्रपटाच्या सेटवर दिसतो. अबरामला लोकांशी बोलायला आवडते.

आणखी वाचा : “माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट

सुहाना आणि आर्यन दोघे मोठे झाले आहेत. आर्यनला अभिनेता होण्याची इच्छा नाही. त्याला कॅमेऱ्याच्या पाठी राहून दिग्दर्शक बनायच आहे. दुसरीकडे सुहानाला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. सुहानाने या आधी नाटकांमध्ये काम केलं आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.