अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किंग’ मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का बॉलीवूडचा किंग शाहरुख खानही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतो. त्याचे चित्रपट यशस्वी होण्यासाठी तो ‘या’ खास गोष्टींचे पालन करतो, ज्यामुळे त्याचे चित्रपट यशस्वी होतात.

जेव्हा या अभिनेत्याने ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘झिरो’सारखे मोठे चित्रपट दिले, तेव्हा असे वाटत होते की आता कदाचित शाहरुख पूर्वीसारखे पुनरागमन करू शकणार नाही. अभिनेत्यानेही बराच ब्रेक घेतला, पण जेव्हा तो ‘पठाण’ आणि ‘जवान’सह परतला तेव्हा त्याने धमाल केली. अभिनेत्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या यशामागे वास्तुचे महत्त्वही समोर आले.

शाहरुख खान वास्तु टिप्स करतो फॉलो

खरं तर, अलीकडेच निर्माते आनंद पंडित यांनी स्क्रीन मासिकाला सांगितले की, शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांपूर्वी त्याच्याकडून वास्तुशास्त्राबाबत सल्ला घेतला होता. आनंद पंडित म्हणाले, “मी शाहरुखला एका खास एनर्जी आधारित वास्तुशास्त्राबद्दल सांगितले, जे मी स्वतः फॉलो करतो. आम्ही त्याच्या घराची एनर्जी थोडीशी अ‍ॅडजेस्ट केली आणि त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत.”

याआधी शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आनंद पंडितच्या ६० व्या वाढदिवशी म्हणत होता, “ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. जेव्हा माझा कोणताही चित्रपट चांगला चालत नाही, तेव्हा मी त्यांना घरी बोलावतो आणि म्हणतो, “सर, माझा शेवटचा चित्रपट चांगला चालला नाही, काहीतरी करा. मग ते आरसा फिरवतात.” शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही या खास वास्तु टिप्स फॉलो करतो.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर अभिनेता आता त्याचा ‘किंग’ चित्रपट शूट करणार आहे. या चित्रपटात तो त्याची मुलगी सुहाना खानबरोबर दिसणार आहे. याशिवाय अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी आणि अनिल कपूर असे कलाकार या चित्रपटात असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २० मेपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.