मराठी कला क्षेत्रातली प्रसिद्ध जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. हे दोघे एक उत्तम कलाकार असून सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. सिद्धार्थ आणि मिताली २४ जानेवारी २०२१ रोजी लग्न बंधनात अडकले. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
लग्ननंतर सिद्धार्थ मिताली इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. सिद्धार्थने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धार्थने शेअर केलेला मितालीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत मिताली एका खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. त्यानंतर सिद्धार्थ चांदेकर स्वापाघरात जाऊन शेगडीवरची रिंग घेऊन मितालीच्या डोक्यावर ठेवतो. या व्हिडीओमध्ये गुरु रंधावाच ‘तुम्हारी सुलू’ मधील ‘बनजा तू मेरी रानी’ हे गाणं प्ले होत आहे. या व्हिडीओ खाली त्याने “स्वस्त आणि टिकाऊ क्राऊन” असे मजेशीर कॅप्शन देखील लिहिले आहे.
सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकाऱ्यानी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थच्या पोस्टखाली मितालीने “छपरी” अशी कमेंट केली आहे ‘तर चंद्र आहे साक्षीला’ अभिनेत्री ऋतुजा बागवेने पण “व्हा !!” असे लिहून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. तसंच एका फॅनने “किती गोड आत्ता पर्यंतच पाहिलेला बेस्ट व्हिडीओ आहे हा” अशी कमेंट केली. सिद्धार्थचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे.
दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता. आणि नंतर पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी लग्नबंधनात अडकले. त्यावेळी तेथे सई ताम्हणकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, अभिज्ञा भावे आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली होती.