सनी लिओनीच्या घरात काटेकोरपणे पाळला जातो 'हा' नियम; कारण वाचून कित्येकांनी केलं सनीचं कौतुक | sunny leone made a very strict rule in the house for sake of her children says in interview | Loksatta

सनी लिओनीच्या घरात काटेकोरपणे पाळला जातो ‘हा’ नियम; कारण वाचून कित्येकांनी केलं सनीचं कौतुक

सोशल मीडियावर सनीबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जातात.

सनी लिओनीच्या घरात काटेकोरपणे पाळला जातो ‘हा’ नियम; कारण वाचून कित्येकांनी केलं सनीचं कौतुक
सनी लिओनी | sunny-leone

सनी लिओनी ही सध्या बॉलिवूडचा एक अतूट भाग झाली आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये काम करायला आलेली सनीला प्रेसक्षकांनीही लगेच स्वीकारलं. काही चित्रपटात आयटम नंबर तर काही चित्रपटात छोटीशी भूमिका करत तिने स्वतःचा चांगलाच जम इथे बसवला आहे. इतकंच नाही तर कित्येक रीयालिटि शोमध्येही ती आपल्याला दिसते.

सनी तिच्या हॉट, ग्लॅमरस आणि मादक अदांसाठी चांगलीच चर्चेत असते. सनीचा भूतकाळ जरी मागे राहिला असला तरी अजूनही बरीच लोकं तिला त्याच दृष्टिकोनातून बघतात आणि सोशल मीडियावर तिला ट्रोल करत असतात. याच कारणामुळे आणि मुलांच्या भवितव्यासाठी तिने तिच्या घरात ‘नो सोशल मीडिया’ हा दंडक घातला आहे. याविषयीच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनीने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

सनी म्हणते, “आमची तिनही मुलं सध्या बरीच लहान आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय याची जाणीव नाही. त्यांनी आत्ता त्यांचं बालपण अनुभवायला हवं. जगात काय चाललंय किंवा त्यांच्या आई वडिलांबद्दल कोण काय बोलतंय याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. आम्ही घरात असताना एकमेकांशी सगळं शेअर करतो. आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा सोशल मीडिया बघायचं कटाक्षाने टाळतो. सोशल मीडियावर आमच्याविषयी बरंच नकारात्मक बोललं जातं, लिहिलं जातं पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.”

सनी ही तिच्या बोल्ड अंदाजाप्रमाणे बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. तिला सोशल मीडियावर बरंच वाईट साईट बोललं जातं, तिच्याविषयी अफवा पसरवल्या जातात. पण ती तिच्या कामात व्यस्त असते. पुढच्या वर्षी ‘द बॅटल ऑफ भीम कोरेगांव’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे, या चित्रपटात तिच्याबरोबर अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ प्रश्नावर जॅकी श्रॉफ म्हणाले, “तुमच्यामुळे माझी भाषा… “

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया
“आता प्रेक्षकांना…” दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांवर प्रकाश राज यांनी केलं भाष्य
‘…अन् अचानक लग्न ठरलं’ मोहित रैनाने सांगितला पत्नीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
“…तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन पर्यटन करत होते”; सीमाप्रश्नावरून बाळासाहेब थोरातांची शिंदे सरकारवर टीका
Suresh Raina Video: लॉर्डसच्या ग्राऊंडवरुन थेट गल्लीच्या मैदानावर; सुरेश रैनाचा साधेपणा चाहत्यांनाही भावला
भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवा ,‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना
Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?