‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०२२ला सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरली होती. अभिनेत्री दीपा परब हिने साकारलेली अश्विनी, अभिनेता आदित्य वैद्य साकारलेला श्रेयस, शिल्पी, मयुरी अशा मालिकेतल्या सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मनात घर निर्माण केलं. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिकेचे शूटिंग पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून भावुक पोस्ट लिहित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री दीपा परब हिने काल ‘तू चाल पुढं’च्या सेटवरील पहिला आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला होता. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आज अभिनेत्रीने नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नवीन घरातील प्रवेश आणि शूटिंगच्या अखेरचा दिवस पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’नंतर ‘आई कुठे काय करते’ मालिकेला टक्कर द्यायला देणार आता….; पाहा प्रोमो

अभिनेत्री दीपा परबने हा व्हिडीओ शेअर करत लिहिल आहे, “अश्विनीची नवीन घराची स्वप्नपूर्ती आणि दीपाचा यापुढील प्रवास या दोन्हीचा साक्षीदार राहील हा गणू” दीपाच्या या व्हिडीओवर मालिकेच्या प्रेक्षकांना भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अभिनेत्रीला पुढीला वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, “आता तर मी निषेध…” 

दरम्यान, याआधी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ व ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांनी प्रेक्षकांना निरोप घेतला होता. आता जुन्या मालिका बंद होत असल्या तरी नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच ‘झी मराठी’वर ‘पारू’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका सुरू होणार आहेत. शिवाय ‘ड्रामा Juniors’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या शोसाठी ऑडिशन सुरू आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress deepa parab took home this thing from the sets of tu chaal pudha pps