‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. २०१९च्या अखेरीस सुरू झालेल्या या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं असून प्रेक्षकांना आपल्या घरातील पात्र वाटून लागली आहेत.

‘आई कुठे काय करते’मध्ये मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने हे पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. तसेच इतर कलाकारांनीही आपापली पात्र सहजसुंदर अभिनयाने छान निभावत आहेत. त्यामुळे आजवर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आता लवकरच या मालिकेला टक्कर देण्यासाठी एक टीम येणार आहे.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”

हेही वाचा – स्वानंद तेंडुलकरला गौतमी देशपांडेची बदलायची आहे ‘ही’ सवय, म्हणाला, “एक पोत भरून…”

याआधी, डिसेंबर २०२३मध्ये ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेला टक्कर देण्यासाठी ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘प्रव्हेंजर्स’ आले होते. त्याचप्रमाणे ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिका विरुद्ध ‘प्रव्हेंजर्स रिटर्न्स’ यांच्यात सांगीतिक लढत होणार आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल प्रोमोमध्ये,‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांना टक्कर देण्यासाठी स्टार प्रवाहवरील जुन्या मालिकेतील कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील सूर्या दादा, अंजी अवनी, ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती, दौलतराव जामखेडकर, ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू आणि ‘रंग माझा वेगळा’मधील आर्यन यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार म्हणजेच ‘प्रव्हेंजर्स रिटर्न्स’ ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांना टक्कर देणार आहेत.

हेही वाचा – “काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका अन्…”, राज ठाकरेंच्या टोपणनावाच्या मुद्द्यावर मत मांडताना आनंद इंगळे स्पष्टच बोलले, म्हणाले…

दरम्यान, यापूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिका विरुद्ध प्रव्हेंजर्समधली सांगीतिक लढत ‘प्रव्हेंजर्स’ जिंकले होते. आता पुन्हा एकदा ‘प्रव्हेंजर्स’ बाजी मारून ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांना हरवणार का? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.