मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. तर आता मोठ्या कालावधीनंतर तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरु झाली. यामध्ये ती एका सक्षम महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे प्रमुख भूमिका साकारत आहे. पण आता दीर्घकाळाने पुनरागमन करताना तिने याच मालिकेची निवड का केली याचं उत्तर तिने दिलं आहे.

आणखी वाचा : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेबद्दल तिच्या आई-वडिलांनी दिली प्रतिक्रिया, लेकीचं काम पाहून म्हणाले…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, “मी मुद्दाम हीच मालिका निवडली असं नाही. आपण आपल्याला विचारल्या गेलेले प्रोजेक्ट्स घेतो. मला जेव्हा सतीश राजवाडे सरांचा फोन आला तेव्हा ते मला म्हणाले की मी अशी अशी मालिका करतोय; मला असं वाटतं की तू ही भूमिका छान निभावशील. तिथेच माझे सगळे प्रश्न निघून गेले. कारण माझा त्यांच्या व्हिजनवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही याआधी एकत्र काम केलं आहे आणि मला त्यांच्या कामाबद्दल खूप आदर वाटतो. त्यांना पुढचं छान दिसतं की काय होणार आहे. कसं होणार आहे. ज्या गोष्टी आपल्याला आत्ता पाहताना त्या कशा होतील असे आपल्याला प्रश्न पडतात तिथे त्यांची उत्तरं असतात. त्यामुळे त्यांच्या शब्दाबहेर मी इथे आले.”

हेही वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून…

तर तेजश्रीचे चाहते तिला बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मालिकेत पाहून खूप खुश झाले आहेत. सोशल मिडियावरून त्यांना या मालिकेतील तिचं काम आवडलं असून पुढील भागांसाठी ते खूप उत्सुक असल्याचं सांगत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress tejashri pradhan revealed why did she say yes to her new serial premachi gosht rnv