आजकाल सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे नारकर कपल नेहमी चर्चेत असतं. अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शेअर करत असतात. पण यामुळे ते कधीकधी ट्रोलही होतात. मात्र याला दोघंही सडेतोड उत्तर देतात. नुकताच ऐश्वर्या नारकरांनी दोघांचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो काही जणांना आवडला आहे. तर काही जणांना अविनाश यांचा डान्स खटकला आहे. पण खटकणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्टच उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या अविनाश नारकरांबरोबर दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीत असून अभिनेते जांभळ्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाच्या पायजमामध्ये पाहायला मिळत आहे. दोघांचं बॉडिंग अनेकांना खूप आवडलं आहे.

हेही वाचा – अविनाश नारकरांची ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, गेले अडीच वर्ष प्रेक्षकांचं करत होती मनोरंजन

“तुम्ही दोघं खूप क्यूट आहात”, “किती गोड. फक्त गाण्यातील भाषा नाही समजली”, “तुम्ही दोघं खूप छान डान्स करता”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण काही नेटकऱ्यांनी अविनाश नारकर यांचा डान्स खटकल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्ही ग्रेसफुली मुव्ह करता. पण काका कधी कधी अती वाटतात.” या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या म्हणाल्या, “तो डान्सचा आनंद घेत आहे. बाकी कशाचाही फरक पडत नाही.”

हेही वाचा – Video: पापाराझीचं ‘ते’ कृत्य पाहून भडकला रणबीर कपूर, व्हिडीओ पाहून नेटकरी देखील संतापले, म्हणाले, “यांच्यासाठी कठोर…”

तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने व्हिडीओ पाहून लिहिलं, “सर तुम्ही मीटरमध्ये नाचू शकता, हे मला पण माहित आहे. पण तुम्ही जाणूनबुजून असा का डान्स करता? तुम्हाला ते छान नाही दिसत. २०११मध्ये मी तुम्हा दोघांना भेटलो होतो. तेव्हा तुम्ही एकदम कडक कपल होता. पण आता १२ वर्षात हे काय झालंय?” यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “डान्स एन्जॉय करणं महत्त्वाचं. तोच तर उद्देश आहे. तुम्हीही आनंद घ्या. ही स्पर्धा नाही. धन्यवाद.”

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसंच ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.