Aishwarya Narkar And Titeekshaa Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही ‘झी मराठी’वरील मालिका आजच्या घडीला घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर अशा अनेक कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तितीक्षा मालिकेत नेत्रा हे पात्र साकारत असून, ऐश्वर्या नारकर यामध्ये काही दिवसांपूर्वी रुपाली म्हणजेच विरोचकाची भूमिका साकारत होत्या. मालिकेच्या कथानकानुसार नेत्रा विरोचकाचा वध करते. यानंतर ऐश्वर्या मालिकेतून एक्झिट घेणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. अखेर शतग्रीवच्या रुपात ऐश्वर्या यांनी मालिकेत नव्या रुपात एन्ट्री घेतली आहे.
ऐश्वर्या नारकर आता शतग्रीवच्या रुपात विरोचकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दाखल झाल्या आहेत. ऑनस्क्रीन नेत्रा आणि शतग्रीवची कितीही भांडणं असली तरीही, यांचा ऑफस्क्रीन बॉण्ड खूपच सुंदर आहे. मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढून या अभिनेत्री रील्स व्हिडीओ बनवत असतात. विशेषत: ऐश्वर्या नारकरांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. या वयात त्यांची एनर्जी, त्यांचा फिटनेस, उत्साह या सगळ्या गोष्टींचं नेटकरी कौतुक करत असतात.
हेही वाचा : Bigg Boss Marathi मध्ये डबल एविक्शन! योगिता अन् निखिल घराबाहेर; जाताना ‘या’ दोन सदस्यांना केलं नॉमिनी, जाणून घ्या…
ऐश्वर्या व तितीक्षा यांचा डान्स
ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) आणि तितीक्षा तावडे यांनी नुकताच कोल्हापुरी हलगीवर ठेका धरला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर हलगीचा ऑडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर काही दिवसांपूर्वी ‘पारू’ फेम शरयू सोनावणे देखील थिरकली होती. आता या कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षाने जबरदस्त डान्स केला आहे.
ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांनी या व्हिडीओमध्ये डान्स करताना मालिकेच्या शूटिंगनुसार बंगाली लूक केला होता. सध्या त्या मालिकेत शतग्रीवच्या रुपातच झळकत आहे. तर, नेत्राने गुलाबी रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या व तितीक्षा यांनी कोल्हापुरी हलगीवर ठेका धरल्याचं पाहताच नेटकऱ्यांनी या दोन मैत्रिणींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुंदर…”, “मस्तच…”, “नेत्रा आणि शतग्रीव एकत्र एकदम कमाल, तोडच नाही…”, “एकदम कडक”, “जलवा…” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd