Video: "तू खोटारडी..."; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत | amitabh bachchan calls kajol a liar on the set of kbc | Loksatta

Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अलीकडेच काजोल तिच्या टीमबरोबर ‘बिग बॉस १६’ च्या सेटवर पोहोचली होती. त्यानंतर आता काजोल ‘केबीसी ज्युनियर’मध्ये सहभागी होताना दिसली. या विशेष भागातील काजोलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन तिला खोटारडी म्हणताना दिसत आहेत.

‘सोनी टीव्ही’ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘केबीसी ज्युनियर’ च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागाचा प्रोमो रिलीज केला आहे. या क्लिपमध्ये काजोल आणि चित्रपटाची दिग्दर्शिका रेवती अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेल्या दिसत आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी तिथे उपस्थित मुलांना काजोलला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली. यानंतर एक एक करून मुलांनी काजोलला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ओळी ठेवल्या. यावेळी एका मुलाने काजोलला विचारलं, “तू कडक आई आहेस की कूल आई?” यानंतर काजोल काही बोलायच्या आत दुसर्‍या एका मुलाने विचारले, “लहानपणी तू तुझ्या आईचा कधी मार खाल्ला आहेस् का?’ पण अशातच एका मुलाच्या प्रश्नाने काजोललाही हसू आवरता आलं नाही.

आणखी वाचा : “लोक वाईट बोलतात याचा अर्थ न्यासा…”; लेकीला ट्रोल केलं जाण्याबद्दल काजोलने सोडलं मौन

एका मुलाने काजोलला विचारलं, “‘कभी खुशी कभी गम’मध्ये तू अमिताभ बच्चन यांना खूप घाबरली होतीस असं आम्हाला पहायला मिळालं. पण खऱ्या आयुष्यातही तू अमिताभ सरांना तितकी घाबरतेस का?” यावर काजोल हसली आणि म्हणाली, “हो. मी त्यांना खूप घाबरते.” काजोलच्या या वाक्यावर अमिताभ बच्चन यांनी एका क्षणाचाही विलंब न करता लगेच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “तिला खोटं कसं बोलायचं ते चांगलं माहीत आहे.” हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video: काजोलबरोबर रोमान्स करणाऱ्या मराठमोळ्या गश्मीर महाजनीची सर्वत्र चर्चा; नेटकरी म्हणाले, “शाहरुखपेक्षा…”

काजोल आणि रेवती यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही भरपूर गप्पा मारल्या. ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काजोल आणि राजीव खंडेलवालबरोबर विशाल जेठवा, आहाना कुमरा, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. त्याचप्रमाणे आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:02 IST
Next Story
वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत