अभिनेते अविनाश नारकर त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांचं प्रत्येक रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतं. या रीलमधील अविनाश यांचा एनर्जेटीक डान्स तरुणाईला लाजवेल असा असतो. अशातच आता अविनाश यांची लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सन मराठी’ वाहिनीवरील २०२१पासून अविनाश यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कन्यादान’ मालिका सुरू आहे. या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर ही सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.

हेही वाचा – Video: “किती छान! उर भरून आला”, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांची मैफल ऐकून सुकन्या मोनेंची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

गेले अडीच वर्ष ‘कन्यादान’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं. यावेळी केक कापून रॅप पार्टी करण्यात आली.

हेही वाचा –Video: रणबीर-आलियाच्या लेकीच्या ‘या’ व्हिडीओनं सगळ्यांचं वेधलं लक्ष, पाहा राहा कपूरचा क्यूट अंदाज

दरम्यान, ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिका बंद होत असली तरी लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयश टिळक व पल्लवी पाटील यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आदिशक्ती’ नवी मालिका सुरू होणार आहे. ६ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash narkar kanyadan marathi serial will off air pps