मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या रील्समुळे चर्चेत असतात. अनेकदा पती अविनाश नारकर यांच्याबरोबर त्यांचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात. ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील सहकलाकारांबरोबर त्या धमाल मस्ती करत असतात.

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांचं ऑफ स्क्रिन नातं खूप खास आहे. दोघीही अनेकदा सेटवर, मेकअप रूममध्ये एकत्र डान्स व्हिडीओ, रील्स काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. जरी यांच ऑन स्क्रिन नायिका आणि खलनायिकेचं असलं तरी खऱ्या आयुष्यात दोघी अगदी मैत्रिणींसारख्या राहतात.

हेही वाचा… लंडनमध्ये फिरतायत विकी कौशल-कतरिना कैफ; ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

नुकताच ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आजकाल इन्स्टाग्राम, युट्यूब उघडलं तर एकच गाण समोर येतं ते म्हणजे, “बदो बदी”. या गाण्याची भुरळ आता ऐश्वर्या आणि तितीक्षा यांना पडली आहे. या गाण्यावर दोघींनी मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. यात तितीक्षा म्हणते “एक आवाज आहे जो माझ्या कानात नेहमी गुणगुणत असतो” यावर ऐश्वर्या नारकर म्हणतात, “कोणता?” तर हे ऐकल्यावर तितीक्षा आणि ऐश्वर्या दोघी हे गाणं गाऊ लागतात. “आए हाए, ओए होए… बदो बदी, बदो बदी… आख्खे लडी बदो बदी, मोक्का मिले कदीकदी”

ऐश्वर्या आणि तितीक्षा यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्हीच बाकी होती हे ऐकवायला.” तर अनेकांनी हसण्याचे इमोजी वापरत कमेंट केली आहे. हे गाण इतक व्हायरल होतंय की अनेक कलाकारांनाही या गाण्यावर व्हिडीओ करायचा मोह आवरला नाही. हे व्हायरल गाण पाकिस्तानी सिंगर चाहत फ़तेह अली खान यांनी गायलं आहे.

हेही वाचा… लग्नाच्या तीन वर्षानंतर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री जाणार सासरी; गुड न्यूज देत म्हणाली, “मी खूप…”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.