बॉलीवूडचं लोकप्रिय कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. अशातच कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. या कपलचा लंडनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कतरिना गरोदर असल्याचा संशय चाहत्यांना आला आहे. परंतु, आता कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांवर तिच्या टीमने स्पष्टीकरण दिलंय. ती गरोदर असल्याचा निव्वळ अफवा आहेत. कतरिना गरोदर नाही, असं तिच्या टीमने आता स्पष्ट केलंय.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
yami gautam and director aditya dhar blessed with baby boy
यामी गौतम झाली आई! अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Katrina Kaif angry for filmed sneakily in London with vicky kaushal video viral
VIDEO: लंडनमध्ये पतीबरोबर फिरताना व्हिडीओ काढणाऱ्यावर भडकली कतरिना कैफ, नेटकरी म्हणाले…

कतरिनाची टीन ‘रेनड्रॉप मीडिया’ यांनी सगळ्यांना विनंती केली आणि सांगितले की कतरिना गरोदर नाही या फक्त अफवा आहेत.

‘या’ व्हायरल व्हिडीओमुळे अफवेला सुरूवात

कतरिना आणि विकीचा व्हायरल व्हिडीओ हर्मन गोम्स जर्नो या एक्स अकाउंटवरून व्हायरल झाला होता. ‘बॉलीवूडचं कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लंडनच्या बेकर स्ट्रीटमध्ये फेरफटका मारत आहेत. विकीनं तिचा हात हातात धरला आहे,’ असं कॅप्शन या व्हिडीओला दिलेलं.

हेही वाचा… लग्नाच्या तीन वर्षानंतर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री जाणार सासरी; गुड न्यूज देत म्हणाली, “मी खूप…”

या व्हिडीओत विकी आणि कतरिना हातात हात घालून लंडनमध्ये फिरताना दिसतायत. पण, या व्हिडीओमध्ये कतरिना वेगळ्याच प्रकारे चालताना दिसतेय आणि ती गरोदर असेल म्हणूनच अशी चालतेय, असा अंदाज लावायला चाहत्यांनी सुरुवात केली.

विकी-कतरिनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “मला कतरिना खूप आवडते. ती गरोदर आहे का?” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “ती गरोदर आहे म्हणूनच अशी चालतेय.”

हेही वाचा… “पाय दुखायला लागले पण…”, पहिल्याच हिंदी सिनेमात ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला मिळाली होती ‘अशी’ वागणूक; म्हणाले, “चिखलाच्या…”

तर एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “कृपया हे डीलिट करा की, गरोदर आहे.” “तुम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशी ढवळाढवळ करू शकत नाही.” “कृपया त्यांचा व्हिडीओ डिलीट करा” अशा प्रकारच्या कमेंट्सदेखील या व्हिडीओवर आल्या आहेत.

हेही वाचा… “मी अशिक्षित माणूस…”, अक्षय कुमारला अभ्यासाची कधीच नव्हती आवड; म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून…”

याआधी अनेकदा कतरिना गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पुन्हा एकदा चाहत्यांच्या आनंदावर विरझण पडल्यासारखच झालं आहे. कारण विकी आणि कतरिनाने खुद्द त्यांच्याकडे सध्या तरी काही गुड न्यूज नाही हे स्पष्ट केलंय.

दरम्यान, कतरिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात कतरिना झळकणार आहे. कतरिनाबरोबर आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्राही या सिनेमात प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. तर विकी ‘छावा’ या चित्रपटात रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. अ‍ॅमी विर्क आणि तृप्ती डिमरीबरोबर विकी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातही झळकणार आहे.