‘बिग बॉस’चं १७वं पर्व दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. निर्माते टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत. नुकतीच ‘बिग बॉस’ घरात सेलिब्रिटींचा खास मित्र असलेल्या ओरहान अवतारमणी उर्फ ओरीची एन्ट्री झाली. यानिमित्ताने बिग बॉसने स्पर्धकांना ‘ओरी की पार्टी’ हा टास्क दिला. दिल, दिमाग आणि दम या तिन्ही घरातील सदस्यांना ओरीसाठी पार्टी आयोजित करायची होती. जो ओरीसाठी चांगली पार्टी आयोजित करेल तो ‘ओरी की पार्टी’ या टास्कचा विजेता ठरणार होता. यावेळी अंकिता लोखंडे आणि निल भट्टमध्ये चांगलंच वाजलं. दोघं एकमेकांविरोधात बोलू लागले. त्यानंतर आता नॉमिनेशन टाक्सदरम्यानही अंकिता आणि निलमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स टीव्ही’च्या इन्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि निल भट्ट जोरदार भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये, नॉमिनेशन टास्क सुरू आहे. यावेळी निल अंकिता लोखंडेला बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करतो अन् मग दोघांमध्ये कडक्याचं भांडण सुरू होतं.

हेही वाचा – रिंकू राजगुरुला आई-बाबांनी दिलं खास सरप्राइज; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

बिग बॉसचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण अंकिताला पाठिंबा देताना दिसत आहेत. तर काही जण निलला पाठिंबा देताना पाहायला मिळतं आहे. ‘प्रत्येक जण अंकिताला टार्गेट करतं’, ‘मला अंकिता या शोची विजेती वाटतं आहे’, ‘अंकितामुळे निल तेवढा तरी दिसला’, असे अंकिताने चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तर ‘निल बरोबर आहे’, ‘माझा निलला पाठिंबा आहे’, असे अभिनेत्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’साठी घेणार नाही मानधन, पण तरीही कमवणार कोट्यावधी रुपये; कसे काय? जाणून घ्या…

दरम्यान, नुकताच बिग बॉसमध्ये गेलेला ओरी एका दिवसातच शोमधून बाहेर पडला आहे. ओरी हा वाइल्ड कार्ड स्पर्धक नव्हता तर तो फक्त वीकेंडला स्पर्धकांचं मनोरंजन करण्यासाठी बिग बॉसमध्ये गेला होता. लवकरच अब्दू रोजिकची बिग बॉसमध्ये पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 update ankita lokhande and neil bhatt fight in nomination task pps