Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ चा कल्ला होणार सुरू, कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा | bigg boss marathi 4 know about when and where you can watch the show in details | Loksatta

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ चा कल्ला होणार सुरू, कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ चा कल्ला होणार सुरू, कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा
यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.

टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त पण तरीही लोकप्रिय शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वीच हा शो आपल्या मराठी भाषेतही सुरू झाला आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रियही ठरला आहे. आजपासून या शोचं चौथं पर्व सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे. भांडणं असणार नाहीत असं बोललं जातंय त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत एक वेगळीच उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. या पर्वामध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. पण सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर, नेहा खान, समीर परांजपे, किरण माने, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांची नावं चर्चेत आहेत.
आणखी वाचा- चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक

बिग बॉस मराठी ४ चा प्रीमयर आज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर आठवड्याअखेर म्हणजेच वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. ज्यात होस्ट महेश मांजरेकर आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. याशिवाय हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.

आणखी वाचा- Inside Photos : आलिशान हॉल, गॉसिप करण्यासाठी खास कट्टा अन्…; चाळ संस्कृतीची थीम असलेलं ‘बिग बॉस मराठी’चं घर पाहिलंत का?

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून या शोचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यात बिग बॉसच्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे मात्र त्यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे या पर्वात कोणते कलाकार कल्ला करताना दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अद्याप कायम आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझा नवरा मला सुख देतो की…” प्रिया बापटने सांगितला ट्रोलिंगचा धक्कादायक अनुभव

संबंधित बातम्या

Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल
“तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला
“जबरदस्ती गर्भपात, शारीरिक छळ आणि पट्ट्याने मारहाण…” ‘बिग बॉस’मधल्या ‘गोल्डमॅन’ विरोधात पत्नीने केलेले गंभीर आरोप

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण
जत तालुक्याला पाणी योजनांसाठी निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सरकारतर्फे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल ; पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी