Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. घरात तिसऱ्या आठवड्यात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. बाहुल्यांरुपी बाळांची घरात एन्ट्री झालेली आहे. या बाळांचा सांभाळ करण्यासाठी घरातील सदस्यांची दोन टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच ‘बिग बॉस’कडून या टास्कनंतर बीबी करन्सी किती देण्यात येईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बीबी करन्सी मिळवून या टास्कमध्ये बाजी मारण्यासाठी सध्या निक्की आणि अभिजीतच्या दोन्ही टीम्स प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) हा टास्क खेळण्यासाठी स्पर्धकांना काही नियम आखून दिले आहेत. ते म्हणजे, दोन्ही टीम्सच्या हातात बाळ कायम असलं पाहिजे. याशिवाय बाळाचा रडायचा आवाज आला की, लगेच स्विमिंग पूलमध्ये एका सदस्याने उडी मारायची…त्यानंतर लंगोट बदलायचं. भूक लागल्यावर टीममधील एका सदस्याने बाळासाठी पाठवलेलं जेवण एकट्याने पूर्ण संपवायचं. तसेच बाळ ज्या सदस्याच्या हातात असेल त्याने मराठी सोडून इंग्रजी, हिंदी अशा इतर कोणत्याही भाषेचा वापर करायचा नाही.

हेही वाचा : Bigg Boss शी बोलताना योगिता चव्हाण ढसाढसा रडली! जोरदार भांडणांमुळे बिथरली, अभिनेत्रीने केली घरी जाण्याची मागणी

अरबाज-वैभवचं मालवणी भाषेसंदर्भात वक्तव्य

अंकिता टास्क सुरू झाल्यावर बाळाशी मालवणी भाषेत संवाद साधत होती. हे पाहताच विरुद्ध टीमचा संचालक वैभवने त्यांचे पाच हजार बीबी करन्सी कापले. यावर अंकिता म्हणाली, “मी तुला आधीच विचारलं होतं मालवणी चालेल की नाही.” यावर वैभव म्हणाला, “बिग बॉस’ने म्हटलंय फक्त मराठी भाषा बोलायची.” तर, “मालवणी ही मराठी भाषा नाही… ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे” असं वक्तव्य घरात करण्यात आलं आहे. यावर अंकिताने ही भाषा मराठीची उपभाषा असल्याचं सांगितलं. परंतु, तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही.

अंकिताने ठामपणे बाजू मांडूनही अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी कोणीच तिचं ऐकत नाही. या गोष्टीवरून घरात देखील दोन्ही टीम्समध्ये वाद झाले. यावर आता नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याला लेहेंगा घालायला लावला अन्…; माधुरी दीक्षितचा ‘डोला रे डोला’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“मालवणी भाषेला अरबाज नॉन महाराष्ट्रीयन भाषा म्हणाला…हा अपमान आहे”, “हे ४ जोकर आता घराबाहेर आले पाहिजेत”, “वैभव फक्त बैल आहे चमचेगिरी करू शकतो”, “रितेश भाऊ यावरून नक्की काहीतरी बोला”, “मालवणी भाषेचा हा अपमान आहे” अशा प्रतिक्रिया युजर्सनी ( Bigg Boss Marathi ) कालच्या भागावर दिल्या आहेत. एकंदर निक्की अन् तिच्या टीमबद्दल सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi netizens angry on arbaz and vaibhav that both are wrong comment on malvani language sva 00
Show comments