‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. अभिनेत्याचे चाहते त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखतात. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून याची प्रचिती मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात एन्ट्री घेतली. पहिल्याच भागात गौरवने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. आता येत्या भागात हा मराठमोळा अभिनेता चक्क जुही चावला हिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! व्हिडीओमध्ये दिसली कुटुंबाची झलक, म्हणाली…

जुही चावला आणि शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार आहे. ‘तू है मेरी किरण!’ हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेता जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो, गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो. हे सगळं पाहून अभिनेत्री सुद्धा आनंदी होते. पुढे, या स्किटमध्ये सुगंधाची एन्ट्री होती.

गौरव आणि सुगंधाच्या जुगलबंदीवर जुही खळखळून हसत असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा एपिसोड येत्या शनिवार-रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा

दरम्यान, गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “तिकडे पण आग लावणार गौरव सर”, “गौरव तुझा अभिमान वाटतोय”, “थेट जुही चावला वाह” अशा प्रतिक्रिया देत गौरवच्या चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav more recreate darr movie scene for juhi chawla watch new promo of madness machayenge sva 00
First published on: 23-04-2024 at 07:00 IST