गेल्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अल्पावधीच सर्वांची पसंती मिळवली आहे. सध्या मालिकेत सारंग-ऐश्वर्याच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचं कथानक रंजक वळणावर असलं तरीही, शूटिंगमधून वेळात वेळ काढून हे कलाकार एकत्र धमाल करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या ऑनस्क्रीन नणंदेबरोबर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मेरे दो अनमोल रतन”, पती व लेकासाठी नम्रता संभेरावची खास पोस्ट, ‘नाच गं घुमा’बद्दल म्हणाली, “माझा रुद्राज…”

रेश्मा शिंदे व भक्ती देसाईचा भन्नाट डान्स

अलीकडच्या काळात सगळेच कलाकार इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. सर्वत्र चर्चेत असलेल्या एका खानदेशी गाण्यावर रेश्माने जबरदस्त डान्स केला आहे. या डान्समध्ये अभिनेत्रीला तिची ऑनस्क्रीन नणंद भक्ती देसाईने साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. दोघीही एकमेकींबरोबर मजेशीर, खोडकर अशी भांडणं करून ‘देख तुनी बायको कशी’ या खानदेशी गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : “संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…

रेश्माने या व्हिडीओला “जेव्हा नणंद लग्नासाठी घरी राहायला येते…” असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. रेश्मा आणि भक्तीच्या डान्सचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

तसेच किशोरी अंबिये, सुरुची अडारकर, अनघा अतुल, अक्षय वाघमारे, ऋतुजा कुलकर्णी या कलाकारांनी कमेंट्स करत या दोघींचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकरी सुद्धा रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये मराठमोळ्या तरुणाचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स; संजू राठोड कमेंट करत म्हणाला…

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये रेश्मा शिंदे आणि भक्ती देसाईसह सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.