‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घराघरात तितक्याच आवडीने पाहिला जातो. या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात या पर्वाचे पाहिले एलिमिनेशन पार पडले. यावेळी निखिल राजेशिर्के हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला. आता या पर्वाचा तिसरा आठवडा सुरु आहे. त्यामुळे यातील टास्कमुळे मित्रांमध्येही आता वादाची ठिणगी पडू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘भेडिया’चा ट्रेलर प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’वर पुन्हा एकदा साधला नेटकऱ्यांनी निशाणा, म्हणाले…

बिग बॉस यांनी सदस्यांवर काल रोख ठोक हे कार्य सोपवले गेले. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हे कार्य रंगणार असून त्यांच्यामध्ये आज शाब्दिक युद्ध पेटणार आहे. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत. उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज कॅप्टन रोहित शिंदे असणार आहे.

यावेळी किरण माने यांनी भाष्य करत काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला. ते म्हणाले, “ज्यावेळेस चांगली माणसं आपल्यापासून तुटतात आणि आपल्या ग्रुपमध्ये वादंग निर्माण करणारी, गढूळता निर्माण करणारी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. निर्णय क्षमता नसल्याने तुमच्यापासून माणसं तुटतात.”

पुढे ते म्हणाले, “तेजस्विनीला असं वाटतं की, ‘बिग बॉस’ हा गेम फक्त शक्तीचा आहे. पण हा गेम शक्तीचा नसून तितकाच युक्तीचा, बुद्धीचा देखील आहे. तर युक्ती पण येऊ देत तुमच्याकडे. चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा म्हातारा माणूस तुमच्याकडे येऊ दे. पण त्यांना युक्ती अत्यंत फालतू वाटली आणि म्हणनूच त्यांनी दोन बुद्धिमान माणसं काढून टाकली आणि एक गोंधळेला माणूस घेतला. हे सगळं निर्णयक्षमातेच्या अभावामुळे झालं आहे असं मला वाटतं.” किरण हे सगळं बोलत असताना तेजस्विनी काहीही बोलली नाही. पण आता या सगळ्यावर तेजस्विनीचे काय म्हणणे असेल हे बघणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: कुटुंबियांच्या आठवणीत अमृता धोंगडेला अश्रू अनावर, म्हणाली, “इथे सगळेच…”

दरम्यान बिग बॉस मध्ये ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. तर आधीच्या पर्वांप्रमाणेच महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासूनचे या घरात भांडणाचे आणि मतभेदांचे सूर लागलेले पाहायला मिळाले होते. तर त्यामुळे पुढे या स्पर्धेत काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane talked many things about tejaswini in bigg boss house rnv