‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजनेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. हा कार्यक्रम सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. अभिनेत्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमात एन्ट्री केली होती. मात्र, हा कार्यक्रम फार काळ चालू शकला नाही. यानंतर प्रेक्षकांनी त्याला पुन्हा हास्यजत्रेत येण्याची विनंती केली पण, तसे झाले नाही. यादरम्यान आता नम्रता संभेरावने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तुला हे शोभत नाही”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सई लोकूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “येणाऱ्या बाळाला…”

ओंकार भोजनेने ‘हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला तरीही या कार्यक्रमातील सगळे विनोदवीर आजही त्याच्या संपर्कात असतात. नुकताच अभिनेत्री नम्रता संभेरावरने इन्स्टाग्रामवर ओंकार भोजने आणि वनिता खरातबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या तिघांच्या फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा एकत्र फोटो पाहून चाहते विविध शक्यता व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : श्रद्धा कपूर पुन्हा प्रेमात? ‘या’ प्रसिद्ध लेखकाला डेट करत असल्याची चर्चा

‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने सगळ्या कलाकारांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी नम्रता संभेरावने वनिता खरात आणि ओंकार भोजनेबरोबर खास फोटोसेशन केलं. या कार्यक्रमामधील हा फोटो आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात हे तिन्ही कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा : “शाहरुखने जे केलंय ते आम्ही दिग्दर्शक…” ‘जवान’बद्दल भरभरून बोलले विशाल भारद्वाज

नम्रता संभेराव

दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame actress namrata sambherao shared photo with vanita kharat and onkar bhojane sva 00