‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत शशांकने साकारलेली अक्षय मुकादमच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याशिवाय शशांक हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय झाला आहे. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या तेलगी घोटाळ्यावर आधारित वेब सीरिजमध्ये शशांकने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘शो टाइम’ या बहुचर्चित वेब सीरिजमध्ये शशांक झळकला. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने नुकताच आयपीएलच्या १७व्या मोसमातील लाइव्ह क्रिकेट मॅचचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर केला असून चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये दिसली अंकिता लोखंडे; व्हिडीओ पाहून कोणी उडवली खिल्ली, तर कोणी केलं कौतुक

अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ यांच्या व्यतिरिक्त परखड मत अभिनेता व्यक्त करत असतो. त्यामुळे शशांक नेहमी चर्चेत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.

शशांकने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “काजल काटे आणि प्रतिक कदम तुमच्यामुळे पुन्हा एकदा लाइव्ह मॅचची मजा, धन्यवाद आणि मुंबई इंडियन्स तुमचे देखील आभार आमचे मनोरंजन केल्याबद्दल.”

हेही वाचा – Met Gala : तब्बल १९६५ तास, १६३ कारागीर अन्…; मेट गालामध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज! साडीने वेधलं लक्ष

हेही वाचा – Video: गौतमी पाटीलसह झळकणार ‘बिग बॉस’ फेम अभिनेता, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाऊस, म्हणाले, “एकदम भारी…”

दरम्यान, याआधी अभिनेत्री काजल काटेमुळे ‘मुरांबा’ मालिकेतील रमा आणि रेवा म्हणजेच अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि निशाणी बोरुले मुंबई इंडियन्सच्या संघाला भेटू शकल्या होत्या. कारण काजलचा पती प्रतिक कदम मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून काम करतो. त्यामुळेच काजलच्या सोशल मीडियावर क्रिकेटर्सबरोबरचे अनेक फोटो आहेत. काही दिवसांपूर्वी काजलने रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar enjoyed a live cricket match in ipl 2024 pps