सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना कोणाला चांगले, तर काही लोकांना वाईट अनुभव येतात. अनेकदा प्रवास करताना सहप्रवाशांकडून नाहक त्रास होतो. अगदी सामान्य माणसांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच याचा सामना केला आहे. सध्या मराठी कलाविश्वातील अशाच एका अभिनेत्रीला रेल्वे प्रवासादरम्यान चुकीचा अनुभव आला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अश्विनी कासार. अभिनेत्रीने याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. हा घडला प्रकार आपल्या चाहत्यांना सांगत अश्विनीने या संबंधित पोस्टमध्ये मुंबई व रेल्वे पोलिसांना टॅग केलं आहे.

मराठी नाटक व छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून अश्विनी कासारला ओळखलं जातं. अश्विनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अश्विनीला मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करताना काहीसा विचित्र अनुभव आला. प्रवास करताना नेमकं काय घडलं याबद्दल अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सविस्तरपणे सांगितलं आहे.

हेही वाचा : Video : शाहरुखला मिठी मारत सुहाना झाली भावुक; KKR च्या विजयानंतर खान कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडीओ

अश्विनी कासारची पोस्ट

अश्विनी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे.”

अश्विनीने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आणि पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. घडलेल्या प्रकरणाची दखल घेतली जावी म्हणून अभिनेत्रीने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांना सुद्धा टॅग केलं आहे.

हेही वाचा : माधुरी दीक्षित अन् सुनील शेट्टीच्या शोला मिळाले विजेते, ‘डान्स दीवाने ४’ च्या विजेत्यांना मिळाले २० लाखांचे बक्षीस

अश्विनी कासार इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा : Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

दरम्यान, अश्विनी कासारच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट सुद्धा लक्षवेधी असतात. याआधी अभिनेत्रीने ‘सावित्रीजोती’, ‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘मोलकरणी बाई – मोठी तिची सावली’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

याप्रकरणी नुकतीच आणखी पोस्ट शेअर करत अश्विनीने माहिती दिली आहे. “काल ट्रेनमध्ये घडलेल्या प्रकारानंकर मी रितसर पोलीस तक्रार केली आहे. त्यासाठी दादर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं. खूप जणांनी मेसेज, कॉल करून चौकशी केली त्याबद्दल धन्यवाद! रेल्वे पोलिसांचे आभार!” असं अश्विनीने तिच्या नवीन पोस्टमध्ये म्हटलं आहे.