IPL २०२४ च्या जेतेपदावर शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपलं नाव कोरलं आहे. केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर शाहरुख खानचे कुटुंबीय आणि केकेआरच्या खेळाडूंनी मैदानावर एकत्रित सेलिब्रेशन केलं. किंग खानच्या संघाने तब्बल १० वर्षांनी तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

शाहरुख खान अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाला होता. यानंतर किंग खान अंतिम सामन्याला उपस्थित राहणार की नाही? याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अवघ्या एका दिवसात किंग खान घराबाहेर पडला. रविवारी ( २६ मे ) दुपारी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह शाहरुख चेन्नईला रवाना झाला होता. यावेळी त्याची लेक सुहाना, पत्नी गौरी खान, दोन्ही मुलं आर्यन व अबराम, मॅनेजर पूजा ददलानी, अनन्या पांडे, शनाया कपूर ही मंडळी उपस्थित होती.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
KKR and Shah Rukh Khan Flying Kiss Celebration with IPL Trophy Video viral
KKR आणि शाहरूख खानने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘ही’ पोज देत केलं सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
abhijt panse mns candidate
भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Aruna Irani reacts on not having baby
“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

हेही वाचा : “पाय पुरतात का गाडीवर?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेचं भन्नाट उत्तर; म्हणाला…

केकेआरच्या विजयानंतर खान कुटुंबीयांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. मॅच जिंकताच सुहानाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. शाहरुखला मिठी मारून त्याची लाडकी लेक भावुक झाल्याचं स्टेडियममध्ये पाहायला मिळालं. यानंतर किंग खानने त्याचा धाकटा मुलगा अबराम आणि आर्यनला देखील जवळ घेतलं. केकेआरच्या विजयानंतर शाहरुख, त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सध्या सुहानाने शाहरुखला भावुक होत मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सुहाना या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखला “आर यु हॅप्पी…आय एम सो हॅपी” असं बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. वडील आणि मुलांमधल्या या सुंदर नात्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा : Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

हेही वाचा : “आडनावावर, घरच्यांवर जाण्याची गरज नाही”, आस्ताद काळे ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलला; म्हणाला, “सभ्य भाषेत…”

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ चा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात शाहरुखच्या केकेआर टीमने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. २०१२ मध्ये याच मैदानावर, केकेआरने त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकलं होतं. पुढे २०१४ व त्यानंतर थेट दहा वर्षांनी म्हणजे रविवार २६ मे २०२४ रोजी केकेआरची टीम तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरली.