अभिनेत्री प्राजक्ता माळीने अल्पावधीतच उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिचं नशिब बदललं. पण अभिनयक्षेत्रामध्येच करिअर करायचं हे प्राजक्ताचं ठरलेलं नव्हतं. हौस म्हणून तिने या क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर ती आता एक व्यावसायिकाही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “प्राजक्ता माळीबरोबर समलिंगी जोडीदार म्हणून…” विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. एखाद्या अभिनेत्रीला मिळालेलं यश पाहून तुला काही वाटतं का? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, “मला काही वाटत नाही. माझ्या ते स्वभावातच नाही. महत्त्वाचं म्हणजे मी क्लासिकल डान्सर आहे. यामध्ये मी शिक्षणही घेतलं आहे.”

“त्यामुळे अभिनयक्षेत्रामध्ये काही झालं नाही तर माझ्याकडे पर्याय होता. अजूनही माझे पुण्यामध्ये डान्स क्लासेस आहेत. अभिनेत्री व्हायचं हे काही ठरलं नव्हतं. अचनाक भयानक मी या क्षेत्रामध्ये आले. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेपर्यंत मला असं वाटत होतं की ही फक्त माझी हौस आहे. या मालिकेमुळेच माझं आयुष्य बदललं”.

आणखी वाचा – “गुटखा खाऊन…” लेक वाईट मार्गाला जात आहे कळल्यावर एमसी स्टॅनच्या आई-वडिलांनी घेतला होता ‘तो’ निर्णय, रॅपरचा मोठा खुलासा

पुढे प्राजक्ता म्हणाली, “या मालिकेनंतरच लोकप्रियता काय आहे हे कळालं. त्यानंतर लोकप्रियतेची चटक लागली. मुंबई आवडायला लागली. मुंबईमध्ये मी घर घेतलं. त्यानंतर मी इथे राहिले. भरतनाट्यम म्हणजे मी वयाच्या सत्तरीपर्यंत नाचणार आहे. मला माहित आहे की मी तोपर्यंत जगणार आहे.” नृत्यकौशल्य ही प्राजक्ताची आवड आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali talk about her personal life says i will live for ages see details kmd