मराठी कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय चालू घडामोडींविषयी भाष्य करत असतात. पण यामुळे अनेकदा ट्रोल होतात. काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात, तर काहीजण ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. सध्या अभिनेत्री विशाखा सुभेदारचा एक रील चांगलाच चर्चेत आला आहे. या रीलवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी चाहत्यांच्या मनोरंजनासाठी डान्स रील शेअर करत असते. पण तिला अनेकदा वजनावरून ट्रोल केलं जात. मात्र याला विशाखा चोख उत्तर देते. काही दिवसांपूर्वी विशाखाने ‘पहिल्यांदा’ या ट्रेंडिंग गाण्यावर रील केला होता; जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “या भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची समीर परांजपेसाठी खास पोस्ट, म्हणाली, “माझं दुर्दैव…”

हेही वाचा – “अंतिम सामना वानखेडेलाच पाहिजे”, भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर ‘या’ मराठी कलाकारांचं मत

विशाखाच्या या रीलवर कलाकारमंडळींसह नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने विचारलं की, सेफ्टी पिन डोक्याला… यावर अभिनेत्री म्हणाली, “थोडा हटके…आणि हल्लीची फॅशन आहे म्हणे असे रफ लूक देताना युज करतात.. मला ही जरा वेगळंच वाटलं, पण म्हटलं घ्या करून हेअर डिपार्टमेंटकडे आपलं डोकं सोपावायचं…आणि त्यांनी क्रेझी बनवलं…” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने विशाखाच्या रीलवर ‘इज्जत घालवली’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “यात काय इज्जत घालवली?” असा सवाल केला आहे.

हेही वाचा – लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेत रागिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिने साकारलेली ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. यापूर्वी विशाखा ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. तिने या व्यतिरिक्त अनेक चित्रपटात काम देखील केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar answer to trollers pps