Mrunal Dusanis : ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मध्यंतरीच्या काळात ती कलाविश्वापासून दूर होती. २०१६ मध्ये मृणालने लग्नगाठ बांधली. लग्न झाल्यावर काही वर्षे तिने मालिकांमध्ये काम केलं. मात्र, त्यानंतर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेने ऑक्टोबर २०२० मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर मृणाल ( Mrunal Dusanis ) अमेरिकेला शिफ्ट झाली. तिला नुर्वी नावाची गोंडस मुलगी सुद्धा आहे. यंदा मार्चमध्ये नवरा नीरज आणि आपल्या गोड लेकीसह मृणाल भारतात परतली. तिच्या कमबॅकनंतर तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले होते. लवकरच अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अशातच मृणालने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची थेट लॉरेन्स बिश्नोईसाठी पोस्ट; म्हणाली, “तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचंय…”

मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis ) आणि तिचा नवरा नीरज मोरे यांनी मिळून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय…तुम्ही गेस करू शकता का?” तसेच या कॅप्शनच्या खाली “लॉन्चिंग सून’, ‘नवीन उपक्रम’, ‘कमिंग सून’, ‘स्टे ट्यून” असे टॅग्ज अभिनेत्रीने वापरले आहेत. त्यामुळे आता मृणाल नवीन व्यवसाय सुरू करणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हेही वाचा : दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर खुशबू तावडेने पहिल्यांदाच चिमुकल्या लेकीसह शेअर केले फोटो, नाव केलं जाहीर

हेही वाचा : Bigg Boss 18: “तुमची आठवण येतेय, परत या…”, गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घराबाहेर गेल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

मृणालच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स ( Mrunal Dusanis )

मृणालच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स

अमेरिकेहून भारतात आल्यावर अभिनेत्री ठाणे येथे स्थायिक झाली. नुकत्याच काही मुलाखतींमध्ये अभिनेत्रीने लेकीसाठी आपलं घर कसं सजवलंय हे देखील सांगितलं होतं. त्यामुळे मृणाल नवीन घर घेण्याची शक्यता फारच कमी आहे. हा सगळा विचार करून तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर अभिनंदनाचा वर्षाव करत “नवीन हॉटेल किंवा बिझनेस असणार…”, “माझ्यामते नव्या व्यवसायाची ही झलक आहे”, “नवीन व्यवसाय exicited” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal dusanis shares video of her new venture netizens predict its a new business watch now sva 00