Online TRP List : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन व टेलिव्हिजन अशा दोन्ही माध्यमातील टीआरपीमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. अनेक नवनवीन शो येऊनही मालिकेला आपली लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यात यश मिळालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो सुरू झाल्यावर टीआरपीच्या शर्यतीत काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर अपेक्षेप्रमाणे या सीझनची सर्वत्र सुरू चर्चा सुरू असून, ‘बिग बॉस मराठी’ने टीआरपीच्या यादीत अनेक लोकप्रिय मालिकांना चांगलीच टक्कर दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम ऑनलाइन टीआरपीमध्ये ३६.२ रेटिंग्जसह चौथ्या स्थानावर आहे. तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेने ३८.६ रेंटिगने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. ऑनलाइन टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आहे. तर या मागोमाग मुक्ताच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

ऑनलाइन टीआरपीची ( Online TRP ) संपूर्ण यादी लक्षात घेता टॉप – १० मध्ये एकूण ८ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या मालिका आहेत. त्यामुळे टेलिव्हिजनप्रमाणे ऑनलाइन टीआरपीच्या यादीत सुद्धा ‘स्टार प्रवाह’ने आपला दबदबा कायम ठेवल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : “खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी…”, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ अन् क्षिती जोग झळकणार एकाच चित्रपटात, पाहा पोस्टर

ऑनलाइन टीआरपी ( Online TRP ) : टॉप १५ मालिकांची यादी

१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
३. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
४. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
५. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
६. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. मन धागा धागा जोडते नवा – हॉटस्टार
११. पारू – झी ५
१२. शुभविवाह – हॉटस्टार
१३. तुला शिकवीन चांगलाच धडा – झी ५
१४. शिवा – झी ५
१५. सुख म्हणजे नक्की काय असतं – हॉटस्टार

हेही वाचा : “त्या ‘फिक्की’चा माज उतरवा…”, निक्कीकडून वर्षा यांचा पुन्हा अपमान! पुष्कर जोग म्हणाला, “अरे मर्दांनो…”

Online TRP ( सौजन्य : marathitrptadka )

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा चालू आहे. याशिवाय आता येत्या काही महिन्यात अनेक वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होणार आहे. आता या नव्या मालिका सुरू झाल्यावर टीआरपीच्या यादीत कसा उलटफेर होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online trp list bigg boss marathi at fourth place and tharala tar topped again here is the whole list sva 00