Video: 'ती' एक चुक झाली अन् रेश्मा शिंदे आणि अनघा अतुल गोरेगावला जायच्या ऐवजी पोहोचल्या चर्चगेटला | Reshma shinde shared video of her and anagha atul | Loksatta

Video: ‘ती’ एक चुक झाली अन् रेश्मा शिंदे आणि अनघा अतुल गोरेगावला जायच्या ऐवजी पोहोचल्या चर्चगेटला, व्हिडीओ व्हायरल

या मालिकेतील दीपा आणि श्वेता त्या दोघी त्यांच्या एका चुकीमुळे संकटात सापडल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितलं.

reshma shinde

‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडलीच आहे, पण त्याचबरोबर या मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळतं. त्यातील प्रत्येक कलाकाराच्या कलाकाराच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत असतात. आता या मालिकेतील दीपा आणि श्वेता त्या दोघी त्यांच्या एका चुकीमुळे संकटात सापडल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितलं.

या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता आशुतोष गोखले प्रमुख भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेल्या दीपा आणि कार्तिक या व्यक्तिरेखांबरोबरच या मालिकेत श्वेता ही नकारात्मक भूमिका साकारणारी अनघा अतुलही प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. मालिकेत जरी रेश्मा आणि अनघा यांच्यात मतभेद दाखवण्यात आले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या एकत्र फिरताना दिसतात. पण आता नुकतंच शूटिंग आटपून गोरेगावला यायच्या ऐवजी त्या चुकून चर्चगेटला पोहोचल्या. ही माहिती रेश्माने एक गमतीशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत दिली.

आणखी वाचा : “मेकअप मॅन बदलला वाटतं…”; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लग्नातील दीपाच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

रेश्माने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या दोघींचा एक व्हिडीओ शेअर केला. या त्या दोघी एका रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या दिसत आहेत. व्हिडीओत रेश्मा म्हणते, “तुम्ही बघताय आमच्या मागे ही चर्चगेटला जाणारी ट्रेन आहे. आम्हाला गोरेगावला जायचं होतं. मग आपण काय केलं सांग सगळ्यांना.” त्यावर रेश्माच्या शेजारी बसलेली अनघा म्हणते, “आम्हाला बोरिवलीची ट्रेन पकडायची होती पण आम्ही चुकून चर्चगेटची ट्रेन पकडली आणि आम्ही चर्चगेटची ट्रेन पकडली आहे हे आम्हाला खूप उशिरा समजलं.” त्यावर रेश्मा म्हणते, “लोक असं म्हणतात की, अति घाई संकटात नेई. आम्ही पण घाई केली आणि संकटात सापडलो. आता आम्हाला घरी पोहोचायला उशीर होत आहे. हिची आई तर घरी गेल्यावर हिला खूप मारणार आहे.” त्यावर अनघा म्हणते, “मला तर घरून इतके फोन आले की बाबा माला विचार होते की तू कुठे पोहोचलीस.” त्यावर रेश्मा म्हणते की, “हिची आई हिला खूप मारणार आहे…बिचारी.”

हेही वाचा : Pathaan box office collection: चौथ्या दिवशीही सर्वत्र ‘पठाण’चाच डंका, कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

आता रेश्माने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर हा व्हिडिओ पाहून त्यांच्यातली केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 14:07 IST
Next Story
‘बेशरम रंग’वर सुंबुलने केला डान्स, फराह खान म्हणली, “तू दीपिकाच्या…”