शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने दमदार कामगिरी केली होती. तर आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.

हा चित्रपट बुधवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. पण चौथ्या दिवशी म्हणजेच काल मात्र या चित्रपटाने पुन्हा एकदा चांगली कमाई केली आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, चाहत्यांना सक्सेस मंत्र देत म्हणाला…

शनिवारी असलेल्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काल या चित्रपटाने एकूण ५५ कोटींचा गल्ला जमवला. चार दिवसांची आकडेवारी मिळवता या चित्रपटाने आतापर्यंत देशभरातून एकूण २२१.७५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर आता रविवारीदेखील हा चित्रपट दमदार कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. माझा चित्रपट जगभरातून ४०० कोटींचा आखाडा पार करेल असा अंदाजही वर्तवला जात आहे.

हेही वाचा : “शाहरुख हा धर्मनिरपेक्ष…” जावेद अख्तर यांनी किंग खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. करोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. आता ‘पठाण’च्या कमाईमध्ये आणखीन किती वाढ होणार? हे पाहणं रंजक ठरेल.