Sachin And Supriya Pilgaonkar : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांना ओळखलं जातं. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामुळे सध्या सचिन-सुप्रिया यांची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस बाकी राहिलेले असताना या जोडप्याने एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

१९५६ रोजी ‘चोरी चोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये राज कपूर व नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या जुन्या चित्रपटातील सदाबहार गाणी आजही सर्वत्र लोकप्रिय आहेत. “जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो” हे गाणं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं होतं.

हेही वाचा : देशमुखांच्या सुनांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप! जिनिलीयाने मोठ्या जाऊबाईंसह शेअर केला खास व्हिडीओ, कॅप्शनने वेधलं लक्ष

सुप्रिया व सचिन पिळगांवकर ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम ) Sachin And Supriya

सचिन-सुप्रियाच्या व्हिडीओवर लेकीने केली खास कमेंट

“जहां मैं जाती हूँ…” या ७० वर्षांपूर्वीच्या गाण्यावर आता सचिन-सुप्रिया ( Sachin And Supriya ) यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांचाही रोमँटिक अंदाज यात पाहायला मिळतो. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. तर, सचिन-सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगांवकरने या व्हिडीओवर कमेंट करत, “तुम्ही दोघं केमिस्ट्री या शब्दाची खरी व्याख्या आहात. माय क्युटीज” असं म्हटलं आहे. श्रियाप्रमाणे स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, दिपाली विचारे यांनी देखील सचिन-सुप्रिया यांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Masaba Gupta on Vivian Richards: ‘वर्णद्वेषाबद्दल व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या मनात राग, त्यांनी खूप भोगलं’, मुलगी मसाबा गुप्ता काय म्हणाली?

हेही वाचा : Video : लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर…; ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं, पण अमरावतीत जल्लोषात स्वागत

दरम्यान, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘आम्ही सातपुते’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमधून सचिन-सुप्रिया ( Sachin And Supriya ) यांच्या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. आता लवकरच यांचा ‘नवरा माझा नवसाचा – भाग २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातही पहिल्या भागाप्रमाणे दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल.