छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या तिसऱ्या पर्वाच्या नव्या भागात खासदार संजय राऊत हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात विचारलेल्या राजकीय तसेच वैयक्तिक आयुष्यातील प्रश्नांवर संजय राऊत त्यांच्या खास शैलीत उत्तरं देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून या व्हिडीओमध्ये तो संजय राऊतांना धारदार प्रश्न विचारताना दिसत आहे. “राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र तुम्हीच लिहिलं होतं, असा तुमच्यावर आरोप आहे,” असा प्रश्न संजय राऊतांना विचरला गेला.

हेही वाचा>> सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानच्या भूमिकेची बालकलाकाराशी केली तुलना, म्हणाली, “आमच्या समीरला…”

या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले, “त्या काळातील राज ठाकरे व माझी मैत्री ही जगजाहीर होती. आम्ही एकमेकांकडे अनेक भावना व्यक्त करायचो. त्यांच्या मनात काय आहे, हे मला माहीत होतं. याविषयी आम्ही बाळासाहेब ठाकरेंशीही चर्चा केली होती. पण ही कुटुंबात पडलेली फूट आहे. तेव्हा माझ्यावर तुम्ही राज ठाकरेंच्या फार जवळ आहात, असा आरोप व्हायचा. मी पक्षाचा किंवा उद्धव ठाकरेंचा मालक नाही. मी अनेकांच्या जवळ आहे. त्यांच्याबरोबरची नाती मी टिकवून ठेवली, हे अनेकांना खुपतं.”

हेही वाचा>> “माझे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख होते”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, “मी लहानपणापासून…”

झी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut wrote raj thackeray resignation letter shivsena mp talk about uddhav thackeray in khupte tithe gupte kak