रामायणावर आधारित असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाला डायलॉग, व्हिएफएक्सवरुन ट्रोल करण्यात येत आहे. तसंच चित्रपटातील रावणाचा लूकही प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत. याबाबतच प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राधिका अनेक घडामोडींवर पोस्टमधून व्यक्त होताना दिसते. सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या तिच्या बालनाट्याच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. राधिकाने ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानने साकारलेला रावण व तिच्या बालनाट्यातील रावणाची तुलना केली आहे. या दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे.

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

हेही वाचा>> ‘रामायण’ फेम दीपिका चिखलीया यांनी शेअर केला सीता मातेच्या लूकमधील व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “आदिपुरुष चित्रपटाला…”

“रावणाच्या भूमिकेतील समीर गुमास्ते व ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खान या फोटोमध्ये आहेत. या दोघांमध्ये वयाबरोबरच आणखी बरंच अंतर आहे. आमच्या समीरला रावणाच्या रुपात बघण्यासाठी व्हिएफएक्सची आवश्यकता नाही. गरज आहे ती कोटींच्या संख्येने प्रेक्षकांच्या हजेरीची. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बालनाट्य नक्की बघा,” असं राधिकाने तिच्या पोस्मध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “माझे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख होते”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, “मी लहानपणापासून…”

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात प्रभासने प्रभू राम यांची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तीन दिवस चांगली कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी मात्र ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर आपटल्याचं चित्र आहे.