आजकाल कलाकार मंडळी त्यांच्या कामाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. तसंच सोशल मीडियावरील ट्रेंड नेहमी फॉलो करताना दिसतात. त्यामुळे त्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं असतात. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ ( Shubhvivah ) मालिकेतील कलाकारांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून मराठी मालिकाविश्वातील इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘शुभविवाह’ ( Shubhvivah ) मालिकेतील आकाश म्हणजेच अभिनेता यशोमन आपटेने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. “आप्पाचा विषय लय हार्ड ए…” हे गाणं सध्या ट्रेंड होतं आहे. हाच ट्रेंड फॉलो करत ‘शुभविवाह’ मालिकेतील कलाकारांनी मजेशीर व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत यशोमनसह मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार, विजय पटवर्धन, अक्षय राज, काजल, कुंजिका काळविंट, राजेश साळवी, शीतल शुक्ला हे कलाकार पाहायला मिळत आहे. खुर्चीवर बसलेले रघू काका म्हणजेच अभिनेते राजेश साळवी यांना सगळ्यांनी आप्पा बनवलं आहे. त्यांना हार वगैरे घालून त्यांच्या भोवती सगळेजण धमाल करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: “गणुल्या माझा दिसतोय छान…”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज केंद्रेचं नवं गाणं प्रदर्शित, पाहा

नेटकरी काय म्हणाले? वाचा

‘शुभविवाह’ ( Shubhvivah ) मालिकेतील कलाकारांच्या या व्हिडीओवर हसण्याच्या इमोजीचा अक्षरशः पाऊस पडला आहे. इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता सौरभ चौघुले म्हणाला की, ऐ यशोमन, मधुरा कसे आहात ना तुम्ही दोघं? तर चेतन वडनेरेने लिहिलं आहे, “ही तर आप्पांची हेळसांड आहे.” तसंच प्रथमेश परबने हसण्याचे इमोजी दिले आहेत. याशिवाय एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता आप्पाचा जीव घेता का?” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आप्पाला एवढं जोरजोरात हलवलं की आप्पा परत तुमच्याबरोबर गप्पा नाही मारणार.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आप्पाचे लय हाल नका करू.” अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Shubhvivah

हेही वाचा – Bigg Boss Marathi : पहिल्याच आठवड्यात बेघर झालेल्या पुरुषोत्तमदादा पाटलांना भेटण्यासाठी जपानी चाहत्याने थेट गाठली आळंदी, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘शुभविवाह’ ( Shubhvivah ) मालिकेतील कलाकारांच्या या मजेशीर व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १३ हजारांहून अधिक जणांनी लाइक असून १७० हून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.