मराठी मालिकाविश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तसेच काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्याजागी नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. अशातच आता ‘झी मराठी’वरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”

काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर झी वरील बऱ्याचा मालिकेच्या वेळा बदलण्यात आला. काही मालिका दुपारच्या वेळेत प्रसारित होऊ लागल्या. त्यापैकी एक म्हणजे ‘दार उघड बये’. ही मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होऊ लागली. पण आता ‘दार उघड बये’ मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे. या मालिकेचं काल शेवटचं शूटिंग पार पडलं आहे. परंतु, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचा – Video: अभिनेते अनुपम खेर यांनी एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिली खास भेटवस्तू

रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अबिये अभिनीत ‘दार उघड बये’ गेल्या वर्षी १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आली. आतापर्यंत ३०० हून अधिक भाग या मालिकेचे प्रसारित झाले आहेत. मात्र आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. ७ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळतं आहे.

हेही वाचा – “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

हेही वाचा – “तू इतका सेक्सी का आहेस?” चाहतीच्या प्रश्नावर अभिनेता गश्मीर महाजनीचं उत्तर, म्हणाला….

अशात दुसऱ्याबाजूला ‘दार उघड बये’ या मालिकेत मुख्य भूमिकेतील अभिनेता रोशन विचारे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सोनी मराठी’वरील नवी मालिका ‘खरंच तिचं काय चुकलं’ यामध्ये रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi daar ughad baye serial will be going off air october first week last episode telecast pps