Video : …अन् अचानक कियाराला उचलून घेऊन धावू लागला वरुण धवन, पाहा नेमकं काय घडलं

वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

varun dhawan, kiara advani, jug jugg jeeyo trailer, jug jugg jeeyo, neetu kapoor, anil kapoor, varun dhawan video, कियारा आडवाणी, वरुण धवन, जुग जुग जयो, जुग जुग जुयो ट्रेलर, वरुण धवन व्हिडीओ, कियारा वरुण व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. हे दोघंही मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात चित्रपटाची स्टार कास्ट वरुण धवन, कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. पण त्यावेळी असं काहीतरी झालं की वरुण धवनने कियारा आडवाणीला उचलून घेतलं आणि धावू लागला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वरुण धवन आणि कियारा आडवाणी जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये पोहोचले त्यावेळी तिथे खूप गर्दी होती. अशात वरुणनं कियाराला उचलून घेतलं आणि तो तिथून धावत जाऊ लागला. या व्हिडीओमध्ये दोघांना असं पाहून सर्वजण ओरडताना दिसत आहे. एवढंच नाही तर कियारा आडवणी देखील वरुणच्या या कृतीवर लाजताना दिसत आहे. या व्हिडीओवर सध्या चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये, एका विवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. जे एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत. पण त्यांना याबाबत आपल्या आईवडिलांना सांगण्यास समस्या येत असते. अशातच वरुण धवनला समजतं कि, त्याचे वडील त्याच्या आईला घटस्फोट देण्याचा विचार करत आहेत आणि त्यांचं दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर सुरू आहे.

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल, टिस्का चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Varun dhawan started running after picking up kiara advani watch the video mrj

Next Story
“तुझ्या कर्मांची फळं…” पायल रोहतगीनं ‘धाकड’च्या कलेक्शनवरून उडवली कंगनाची खिल्ली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी