यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जोरदार कामगिरी आपल्याला पाहायल्या मिळत आहे. आरसीबीनं चांगली कामगिरी करत पहिले स्थान पटकावले आहे. काल बंगळुरूने १० विकेट्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. देवदत्त पडिक्कलने नाबाद १०१ धावा केल्या. तर, संघाचा कर्णधार विराट कोहलीने ७२ नाबाद अशी खेळी केली. या दोघांच्या जोरावर आरसीबीनं ही बाजी मारली. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून विराटने पहिल्यांदा अर्धशतक केलं. त्यानंतर त्याने एका हटके अंदाजात यावेळी सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आयपीएल टी२०च्य अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अर्धशतक पूर्ण झाल्याने विराट सेलिब्रेश करताना दिसत आहे. त्याने पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग कीस दिली तर हे अर्धशतक त्याने वामिकाच्या नावावर असल्याचा इशारा केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विराटच्या चाहत्यांना त्याची ही स्टाईल प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७मध्ये लग्न केलं. तर ११ जानेवारी २०२१ रोजी वामिकाचा जन्म झाला. या दोघांनी वामिकाला मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णन घेतला आहे.