बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन. या जोडीने आतापर्यंत तीन चित्रपटात एकत्र काम केले. विशेष म्हणजे हे तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना एवढी भावली होती की, या दोघांचे अफेअर तर चालू नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या तिन्ही चित्रपटात वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा रंगली होती. या दरम्यान आलिया आणि वरुणला तुम्ही एकमेकांना किसिंगसाठी किती गुण द्याल, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या दोघांचे उत्तर ऐकून चाहते अवाक झाले होते.
वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी‘स्टुडंट ऑफ दी इअर’पासूनच हिट ठरली होती. या चित्रपटानंतर दोघांनी‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या दोन चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी ‘वालिया’ असे नावही दिले होते. या तिन्ही चित्रपटात वरुण आणि आलिया एकमेकांना किस करतानाचे अनेक सीन चित्रित करण्यात आले. हे सर्व सीन सुपरहिट ठरले.
पण एकदा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया आणि वरुण या दोघांना तुम्ही एकमेकांना किसिंग सीनसाठी किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते दोघेही एकमेकांकडे पाहात बसले होते.
त्यानंतर वरुणने “मी आलियाला किसिंगसाठी आठ गुण देईन,” असे सांगितले. तर आलियाने “मी वरुणला दहा गुण देईन,” असे सांगितले. तर सहकलाकार म्हणून “मी आलियाला किसिंगसाठी सहा गुण देईन,” असे म्हटले. आलियाने यावेळी “वरुणला दहा पैकी आठ गुण देईन,” असे सांगितले.
दरम्यान या तीन हिट चित्रपटानंतर या दोघांनीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेक्षकांना नवी जोडी पाहता यावी म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर ते दोघं पुन्हा एकदा जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते.